
बेंबळी विकास चर्चा या ग्रुपवर सुरू असलेल्या लाईव्ह व्याख्यानाचे तिसरे पुष्प बेंबळी येथील होमिओपॅथी तज्ञ डॉ. अमोल गावडे आज गुंफणार आहेत. त्यांचा लाईव्ह कार्यक्रम गुरुवारी म्हणजे आज रात्री आठ वाजता सुरू होईल.
बेंबळी विकास चर्चा या फेसबुक पेज वरून आज रात्री ८ वाजता बेंबळी गावचे भूमिपुत्र तथा डॉक्टर अमोल गावडे हे मार्गदर्शन करण्यासाठी लाईव्ह येणार आहेत. तेव्हा आपण या कोरोना व अन्य आजाराबाबत प्रथमता घ्यावयाची काळजी याविषयी थेट प्रश्न कमेंट स्वरूपात विचारावेत.
डॉ गावडे होमिओपॅथी या चिकित्सा शास्त्राची उपचार पद्धतीचा अवलंब जास्त प्रमाणात करतात. त्यामुळे होता होईल तितके प्रश्न हे या उपचार पद्धती विषयी असावेत, असे आयोजकांचे मत आहे. या आधी झालेले 2 बेंबळी विकासचर्चा फेसबुक लाईव्ह वर विचारलेले प्रश्न पत्रकार अॅड. उपेंद्र कटके, डॉ. राठोड, डॉ. अमोल सूर्यवंशी. यांनी योग्य रित्या हाताळले आहेत. प्रेक्षकांनीही यासंदर्भात योग्य प्रकारे प्रतिसाद दिला आहे.
याच पद्धतीने कोरोना व्हायरस या आजाराबरोबर इतर आजारावरही प्रश्न विचारावेत असे आवाहन, आयोजकांनी केले आहे.