उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज 7 रुग्ण सापडले असून उमरगा येथील 1, कळंब तालुक्यातील 5 व उस्मानाबाद तालुक्यातील 1 रुग्णाचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 71 रुग्ण असून त्यापैकी 15 जण बरे झाले आहेत तर 54 जणांवर उपचार सुरु आहेत तर 2 जण रुग्ण मयत झाले आहेत. उस्मानाबाद तालुक्यात 17 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून तुळजापूर तालुक्यातील 4, उमरगा तालुक्यात 15, लोहारा 6, कळंब 14, वाशी 4, भूम 2 तर परांडा तालुक्यात १ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण १ हजार ४२५ पैकी १ हजार १९० अहवाल निगेटिव्ह आले असून 71 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

 
Top