नळदुर्ग /प्रतिनिधी-
 पुण्याहुन उस्मानाबाद मोटारसायकलवरून जात असताना, इंदापूर नजीक गागरगाव लोंढेवस्ती येथे महामार्गावर मोटारसायकलला मागून चारचाकी गाडीने भरधाव वेगात धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील पती पत्नी जागीच ठार झाले. तर त्यांच्या नातीला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मयताचा पुतण्या वैभव शुक्राचार्य दुपारगुडे ( वय 18 ) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये पुण्यात धायरी, गारमाळ, खंडोबाच्या मंदिरा शेजारी राहत असलेले, मिस्त्री काम करणारे दयानंद कुंडलिक दुपारगुडे ( वय 45 ) व त्यांची पत्नी सुवर्णा दयानंद दुपारगुडे ( वय 35 ) सर्व रा. निलेगाव ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला तर त्यांची नात वैदिक मनोज दुपारगुडे ( वय 2 ) हिलाही डोक्याला गंभीर दुखापत झाली.
 
Top