परांडा /प्रतिनिधी 
येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयांमध्ये क्वारंटाइन लोकांना दररोज प्रशिक्षण देऊन त्यांच्या शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आरोग्यसाठी दररोज योगाचे प्रशिक्षण देण्यात येतआहे.
      बार्शी येथील योग प्रशिक्षक अनिल कापुरे हे दररोज महाविद्यालयामध्ये येऊन एकूण १८ लोकांना योगाचे प्रशिक्षण देत आहेत.त्यांची प्रकृती उत्तम राहावी,त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे महाविद्यालयांमध्ये एकूण १८ क्वारांइटन लोक राहतात.त्यांना विविध विभागातील कर्मचारी नियुक्त करून त्यांची देखरेख केली जाते.या सर्व लोकांना विविध विभागातील कर्मचारी तीन शिफ्टमध्ये राष्ट्रीय कार्य आणि सहकार्य करतात. यामध्ये सकाळी दहा ते सहा सायंकाळी सहा ते दोन,रात्री दोन ते दहा अशा शिफ्टमध्ये शाखा कनिष्ठ अभियंता एस.व्ही.टोंपे,इंद्रजीत कांबळे, स्थापत्य अभियंता एम.एम.कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता बी. के.शिराम,मार्ग लिपिक बाळू बोराडे ,स्थापत्य अभियंता खुने बी.आर.,शाखा अभियंता आर.बी.भुतेकर ,स्थापत्य अभियंता सहाय्यक दिनेश ठोंगे आणि कनिष्ठ लिपिक शिंदे टी.डी.हे  कर्मचारी या ठिकाणी  दररोज शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांच्या जेवणाची चहा पाण्याची सोय करून त्यांना सुरक्षितरित्या महाविद्यालयांमध्ये ठेवले जात आहे.पोलीस प्रशासन तसेच डॉक्टर वेळोवेळी त्यांना भेट देत त्यांच्या आरोग्याची विचारपूस करत आहेत.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनीही क्वारांइटन लोकांना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले.सकाळी सात ते आठ या दरम्यान हे योग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्या जात आहे.महाविद्यालयातील कर्मचारी अधिक्षक भाऊसाहेब दिवाणे,भागवत दडमल यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांना आवश्यक असलेली सेवा सतत पुरवण्याचे काम करत आहेत.सध्या मेडिकलमध्ये मास्क आणि सॅनीटायजर उपलब्ध नसल्यामुळे योग प्रशिक्षक अनिल कापुरे यांनी आपली नैतिक जबाबदारी म्हणून दररोज या लोकांना मास्क आणि सॅनी टायजरदेऊन  राष्ट्रीय कार्यामध्ये सहभाग घेतला आहे लोकांना भेटण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी नायब तहसीलदार गणेश सुपे , नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक इंगोले हे भेट देत आहेत व त्यांच्याविषयी माहिती घेत आहेत.
कोरोना वायरसला संपवण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेक प्रयत्न करत आहे.सर्वांनी शासनाला सहकार्य करावे अशी विनंती प्रशासनाकडून केली जात आहे.

 
Top