तुळजापूर/प्रतिनिधी -
तुळजापुर तालुक्यातील मौजे आरळी खुर्द येथील VRL या प्रसिद्ध ट्रान्स्पोर्टमधे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत असणारे सुभाष मोहिते व सर्जेराव दरेकर यांनी पुढाकार घेत गावातील सर्व ड्रायव्हर तरुणांकडून 7580 रू. चा निधी गोळा करून  मुख्यमंत्री निधी मधे जमा करण्यासाठी सरपंच प्रा. सुनील बहिरे यांना देऊन ग्रामपंचायतकडे जमा केला आहे.
यावेळी गावातील सन्माननीय नागरीक औदुंबर नन्नवरे,संजय मोटे,प्रकाश नन्नवरे, अस्लाम पठाण,पंडित शिलवंत,संतोष सोमवंशी,आन्सर पठाण,गोटु उपासे , सर्जेराव दरेकर यांनी मुख्यमंत्री निधी साठी निधी जमा केलेला आहे.या काळात ग्रामपंचायतच्या वतीने गावात मास्क व हॅण्डवाश डेटाॅलचे वाटप घरोघरी करण्यात आले आहे.

 
Top