तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा ट्रस्ट,उस्मानाबाद तसेच ग्रामपंचायत कार्यालय, कामठा यांच्याकडून गावातील गरजूंना सॅनिटायझर आणि मास्क वाटप करण्यात आले.
तसेच ‘आपल्या शेतातील उत्पादित शेतमाल गरजूंना वाटप करा’ या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील प्रगतशील शेतकरी श्री.रामकृष्ण जमदाडे यांच्या वतीने गावातील प्रत्येक कुटुंबांना द्राक्ष वाटप करण्यात आले.यावेळी तुळजापूर चे तहसीलदार तांदळे साहेब, गटविकास अधिकारी श्री.प्रशांतसिंह मरोड साहेब, पंचायत समिती सदस्य श्री.शरद जमदाडे, सरपंच बळीराम साळुंके, उपसरपंच प्रतिनिधी अविनाश रोकडे, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
 
Top