लोहारा/प्रतिनिधी
आज संपूर्ण जगात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण शासकीय प्रशासकीय यंत्रणा आटोकाट प्रयत्न करीत आहे. मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालय व महाराष्ट्र अंधश्रध्दा निमुर्लन समिती, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधीलकी आणि माणूसकीची भावना जपत गेल्या १० दिवसापासून हे कार्य हाती घेतल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या सामाजिक संकटात श्री माधवराव पाटील महाविद्यालय व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून मास्क,गरजूंना अन्नधान्य वाटप, विद्यार्थ्यांना वॉटस्अप व मेसेजद्वारे मानसिक आधार, अभ्यासक्रम व परीक्षेविषयीची चर्चा या सेवा - सुविधा पुरविल्या जात आहेत. सामाजिक बांधीलकीचा एक वेगळा पॅटर्न यानिमित्ताने निर्माण होताना दिसून येत आहे.लॉकडाऊनमुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्यही धोक्यात आल्याची जाणीव झाल्याने काय होईल पुढे ? भविष्याचे काय ? घरात सतत बसून असल्याने मुलांमध्ये निराशेची भावना, विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. अशा वेळी त्यांना भक्कम मानसिक आधाराची गरज असते. हे वेळीच लक्षात घेऊन नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील, संस्थेचे संचालक शरणजी पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील,  जिल्हाध्यक्ष अॅड.देवीदास वडगांवकर, जिल्हा प्रधान सचिव चंद्रकांत उळेकर आदी पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत बिराजदार व मअंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे यांच्या सहकार्याने श्री माधवराव पाटील महाविद्यालयात ‘युवक-युवती मनोबल संवाद मोहिम’ राबविण्याचे ठरविले.
 यासंदर्भात महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापकांशी फोन वरून चर्चा करून चार समित्या स्थापन करण्यात येवून या कामाची विभागणी ५० प्राध्यापकांमध्ये खालील समितीनिहाय कामाची जबाबदारी देण्यात आली. ती खालील प्रमाणे   संभाषण समन्वय समिती : डॉ.नागोराव बोईनवाड, प्रा.प्रतापसिंग राजपूत, डॉ.रमेश आडे, डॉ.राजू शेख, डॉ.सायबण्णा घोडके, डॉ.विठ्ठल कांबळे, डॉ.रविंद्र गायकवाड, डॉ.शीला स्वामी, डॉ.नरसिंग कदम, डॉ.विलास खडके,डॉ.सुभाष हुलपल्ले, डॉ.जयश्री सोमवंशी, डॉ.राम बजगिरे, डाॅ. राजकुमार देवशेट्टे  साहित्य पुरवठा व वाटप समिती : प्रा.दिनकर बिराजदार, प्रा.मुकूंद धुळेकर, डॉ.भिलसिंग जाधव, प्रा.प्रकाश कुलकर्णी, डॉ.अविनाश मुळे, प्रा.राजकुमार तेलंग, डॉ.नागनाथ बनसोडे, प्रा.सोमनाथ व्यवहारे, डाॅ. संध्या डांगे, डॉ.अरूण बावा, डॉ.संजय गुरव, प्रा.अनिल हेबळे, प्रा.दयानंद बिराजदार   संदेश वहन समिती : प्रा.लक्ष्मण पवार, डॉ.सुधीर पंचगल्ले, वडॉ.सतिश शेळके, डॉ. शिवपुत्र कनाडे, प्रा.सचिन राजमाने, प्रा.अंकुश टाकळे, प्रा.नितीन हुलसुर  दक्षता व व्यवस्थापन समिती : डॉ. राजेंद्र गणापूरे, डॉ.किरण राजपुत, डॉ.अरविंद  बिराजदार, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, डॉ.रविंद्र आळंगे, डॉ.चंद्रकांत जावळे, डॉ.विनायक रासुरे, प्रा.राजकुमार, रोहीकर, डॉ.सोमनाथ बिरादार, डाॅ. महादेव कलशेट्टी, प्रा.गोपाळ कुलकर्णी, डॉ.आप्पासाहेब सुर्यवंशी, प्रा.सुजित मटकरी, डॉ.सुशिल मठपती, प्रा.अशोक बावगे आदींना समाविष्ट करून घेण्यात आले. या प्राध्यापकांना महाविद्यालयातील एकूण विद्यार्थी संख्या विभागून देण्यात आली आहे.
या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मानसिक आधार देणे, त्यांच्यात सकारात्मक व वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणे,आरोग्य विषयक काळजी घेण्यास सांगणे खूपच गरजेचे आहे. शिवाय काही विद्यार्थी किंवा त्यांचे कुटुंबिय अडचणीत असू शकतात तर त्यांना त्यादृष्टीने मदतीचा हात पुढे करून सहका र्य करणे. या पद्धतीने विद्यार्थी त्यांच्या पालकांच्या पर्यंत पोहचून दिलासा देणारा हा उपक्रम असल्याचे सांगत आहेत. आज प्रत्येक जण घरातच ‘वर्क फ्रॉम होम’ करत आपल्या कुटुंबासोबत आपले विद्यार्थी व त्यांचे कुटुंबिय यांची काळजी घेण्याची ही खरी मोहिम आहे.प्राध्यापकांनी हा संवाद करताना त्या विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक,सामाजिक, मानसिक व आरोग्यविषयक विचारपूस करून त्यांना घरीच राहण्याचा सल्ला देणे, आपण सुरक्षित राहा, इतरांनाही सुरक्षित ठेवा !जीवनावश्यक वस्तूंची काही उणीव असल्यास ताबडतोब आम्हाला संपर्क करणे, त्यांची मानसिकता ठीक नसेल तर त्यांना अभ्यासासंबंधी किंवा इतर प्रेरणादायी व्हीडीओ पाठवून तसेच सतत त्याच्यांशी संवाद साधून आम्ही आपल्या सोबत आहोत असा भक्कम मानसिक आधार देण्याचे कार्य हे प्राध्यापक करीत आहेत. ‘युवक-युवती मनोबल संवाद मोहिम’ अभियानांतर्गत जे संवाद साधले त्यात ११०९ विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. अशा विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांच्या अडचणींनुसार वर्गीकरण करण्यात आले.ज्या विद्यार्थ्यांना अन्न - धान्याची गरज होती अशांना मदत करण्यात आली. अशा या उपक्रमाबद्ल काही विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आपल्या भावनिक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. काळाची गरज ओळखून गरजू विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय यांच्या संपर्कात आपले महाविद्यालय यापुढेही उभे राहणार असून कोरोनाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवून त्यांना मानसिक तसेच आर्थिक आधार देण्याचा हा छोटाशा प्रयत्न कौतुकास ठरल्याची भावना पालकांमधून व्यक्त होताना दिसून येत आहे. पालकांनीही या उपक्रमाबद्ल समाधान व्यक्त केले.
 
Top