लोहारा/प्रतिनिधी
कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी           
लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायत दक्षिण जेवळी च्या वतीने प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.
दक्षिण जेवळी येथे रुद्र वाडी पश्चिम तांडा अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे. तेथील कर्तव्यदक्ष सरपंच चंद्रकांत   साखरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आर.के.शेख व गट विकास अधिकारी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण जेवळी रुद्रवाडी पश्चिम तांडा येथे आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच ग्रामविकास अधिकारी नेताजी मारेकर, ग्रामपंचायत सदस्य विवेकानंद बिराजदार राम मोरे, प्रविण बोंदाडे,  रोजगार सेवक संगप्पा मुखे, युवा सेना तालुका उपप्रमुख शिवराज चिलगुंडे, यांच्या सहकार्याने संपूर्ण गावामध्ये सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.  
 
Top