लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील  वडगांव (गां) येथे शासन निर्णयानुसार कोरोना सहाय्यता कक्ष निर्माण करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सरपंच बबन फुलसुंदर, ग्रामसेवक एच.एम. चौधरी, पोलीस पाटील एम.डी. लोहार, समतादूत नागनाथ फुलसुंदर, कर्मचारी अमोल साळुंके, भगवंत पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष हणमंत दणाने, हे कोरोना निर्मूलनासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. हे ओळखून ग्रामस्थांनीही भरगोस असा प्रतिसाद दिला.
ग्रामस्थ  प्रशासनाच्या सूचनांचे पालन करताना दिसत आहेत. घरीच राहून कोरोनाची साखळी तोडण्याची प्रयत्न  करत आहेत. कोरोना सहाय्यता कक्षासाठी अनेक जनांनी मदत देऊ केली. त्यामध्ये महात्मा फुले पुरुष बचत गट यांनी गावासाठी सहकार्य म्हणून 5051रु ची आर्थिक मदत केली. हणमंत दणाने युथ फाऊंडेशन यांनी ड्युटीवर असणारे पदाधिकारी यांना प्रत्येकी 1 मास्क आणि 1 सॅनिटायझर असे एकूण 3750/- रु किमतीचे 50 साहित्य वाटप केले. संजय सुभाष फुलसुंदर यांनी 501/- रु ची मदत केली, माजी सैनिक देविदास रामचंद्र साळुंके यांनी 251/- रु ची मदत केली. आनंदराव मनोहर साळुंके यांनी 201/- रु ची मदत केली. असे  एकूण एका दिवसात 9754/-रु चे आर्थिक आणि इतर मदत करण्यात आले
.यावेळी उपस्थित सरपंच यांनी त्याचा स्वीकार केला. आणि त्यांना प्रत्येकी एक सॅनिटायझर आणि मास्क देण्यात आले. त्यांचे आभार सरपंच बबन फुलसुंदर यांनी मानले. यावेळी  पोलीस पाटील एम. डी. लोहार, मुख्याध्यापक विजय गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष हणमंत दणाने, सतीश पाटील, संजय फुलसुंदर, देविदास साळुंके, अदि, उपस्थित होते.
 
Top