तुळजापूर / प्रतिनिधी-
नगरपरिषदेचे  नगराध्यक्ष  सचिन रोचकरी यांनी मंगळवारी शहरातील नागरीकांसोबत फेसबुक लाईवच्या माध्यमातून संवाद साधला.
यावेळी नागरिकांचा विविध समस्या मते ऐकुण घेतले. नंतर आजवर केलेल्या कामाबद्दल माहीती देऊन विविध उपाययोजना बाबत अवगत केले. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य केल्यामुळेच कोरोना सारख्या संकटात आपण सुरक्षित राहीलो आहोत, परंतु अजुनही पूर्णपणे संकट गेलेले नसून पुढील काही दिवस अशाच प्रकारे आपण सहकार्य करावे अशी विनंती केली.
यावेळी मुख्याधिकारी श्री आशिष लोकरे साहेब, नगरसेवक विजय आबा कंदले, औदुंबर कदम, किशोर साठे, राहुल खपले, फेसबुक लाईव यशस्वी करण्यासाठी नगर परिषद अभियंता अविनाश काटकर, सुभाष चव्हाण, अभंग गायकवाड अदि उपस्थितीत होते .
 
Top