लोहारा/प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यात दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची जमावाने पोलिसांच्या समक्ष निर्घृण हत्या केली या घटनेचा भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी जाहिर निषेध करुन तहसीलदार विजय अवधाने यांना दि. २२ एप्रिल रोजी निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि, पालघर जिल्ह्यात दोन साधु व त्यांच्या वाहन चालकाची जमावाने पोलिसांच्या समक्ष काठ्यांनी मारुन हत्या केली. या मॉब लिचिंगच्या घटनेचा तीव्र निषेध करुन या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपी विरुध्द् कठोर कारवाई करण्यात यावी. घटनास्थळी उपस्थित असताना व साधुंनी संरक्षणाची याचना केली असताना त्यांना वाचविण्याचा प्रयत्न न करण्या-या पोलिसांना आरोपी करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी  मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर घटाना १६ एप्रिल रोजी घडली. त्याची चित्रफित १९ एप्रिल रोजी समाजमाध्यमातून प्रसारीत झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आवाज उठवला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जाग आली. आपल्या राज्यात साधुंची हत्या झाल्यानंतर राज्यात मॉब लिचिंग चे प्रकार घडले होते. सदर घटना गैरसमजातून घडली आणि केंद्रशासित प्रदेशात साधुंना रोखले असते तर असे घडले नसते. अशा सबबी सांगून पोलिसांच्या साक्षीने झालेले हे क्रुर हत्याकांड किरकोळीत काढण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवते. अशा प्रकारे या हत्याकांडावर पांघरुण घालण्याच्या प्रयत्नाचा आम्ही निषेध करतो. राज्यात गेल्या नोव्हेंबरमध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. गेल्या काही दिवसात गंभीर घटना घडल्या आहेत. आरोपीला पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधुंचे हत्याकांड झाले.  वरील घटनांची नि:पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 यावेळी भाजपा  तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटिल, माजी तालुकाध्यक्ष विक्रात संगशेट्टी, युवा माेर्चा तालुकाध्यक्ष बालजी चव्हाण, उपस्थित होते.

 
Top