तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील गंधोरा येथील ग्रामस्थांचा रेशन दुकानदार विरोधात असलेल्या तक्रारी चा पार्श्वभूमीवर मंडल अधिकारी व तलाठी यांनी बुधवारा दि 15रोजी गंधोरा येथे जावुन जबाब घेवुन पंचनामा करुन  रेशन दुकान सील केले होते.
या पार्श्वभूमीवर सदरील रेशन दुकान पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिला आहे.  गंधोरा ता तुळजापूर येथील रेशन दुकानदार शेख  यांचा विरोधात युनिट प्रमाणे माल न देता कमी देणे पावत्या न देणे फलक न लावणे विचारणा केली असता अरेरावीची भाषा करणे अशा असंख्य तक्रारी आल्याने या बाबतीत शहानिशा करण्यासाठी तहसिलदार यांनी  मंडल अधिकारी शिंदे व तलाठी शेकदार यांना पाठवले व गावातील सरपंच पोलिस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष समोर ६४ जणाचे जबाब घेवुन पंचनामा करुन रेशन दुकान सील करण्यात आले होते.
 या प्रकरणी पंचनामा व जबाब याचा सविस्तर अहवाल तहसिलदार यांच्या कडे सादर केला होता,  त्यांनी तो वरिष्टाकडे सादर केल्यानंतर रेशन दुकानाचे अधिकार पञ  महाराष्ट्र अधिसुचीत  वस्तू वितरणाचे अधिनियम आदेश 1975 मधील तरतूदी नुसार व शाषण निर्णय 12 नोव्हेबंर 1991 मधील तरतूदी नुसार आदेशाचा दिनांका पासुन निलंबित करण्यात येत असुन सदरील दुकानाला जोडलेल्या शिधापञिका  ग्राहकांची गैरसोय होवु नये म्हणून त्यांची पर्याय व्यवस्था तात्काळ नजिकच्या रास्त भाव दुकानाकडे करावी  वा संबंधित दुकानाचे अभिलेख तात्काळ ताब्यात घेवुन सदरील दुकानाची सविस्तर चौकशी करुन चार आठवड्यात अहवाल तहसिलदार यांनी सादर करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी डाँ. चारुशिला देशमुख यांनी दिले.

 
Top