उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात आसलेल्या तावरजखेडा  (ता.उस्मानाबाद)  येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या हस्ते गावातील नागरिकांना मास्क व सॅनीटाईजर बाॅटल वाटप करण्यात आले.
 आत्तापर्यंत तावरजखेडा गावात मनसेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी तसेच गावात जंतूनाशक फवारनी करण्यात आली.ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाच्या वतीने देण्यात येणारे एका व्यक्तीला ५ किलो तांदूळ प्रत्येक गावकऱ्यांना घरपोच मोफत देण्यात आला असून,तसेच मनसेच्या वतीने कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. मास्क व सनटाईजर वाटप करते वेळी सरंपच मुरली देशमुख, कोंड ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत शेटे,विलास कदम,मुख्याध्यापक,एल,आर,जावळे,सहशिक्षक,बेंदेसर,सर्व ग्रामपंचायत सदस्य, व गावकऱ्यांनी स्वता होऊन मास्क व सनटाईजर बाॅटल घेण्यास उस्फूर्त पणे सहभाग घेतला.

 
Top