तेर/ प्रतिनिधी
जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री कोरोना सहाय्यता मदत निधीसाठी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील दत्तात्रय मुळे यांनी वैयक्तिक ५ लाख व रचना कंस्ट्रक्शन कंपनीच्या वतीने १० लाख रुपया असा एकूण १५ लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्याकडे बुधवारी (दि.२२) सुपूर्द केला.
सामाजिक दायित्व म्हणून तेर येथील रचना कंस्ट्रक्शनचे मॅनेजींग डायरेक्टर सुजीत मुळे यांनी दहा लाख रुपये व दत्तात्रय बळीराम मुळे यांनी वैयक्तिक ५ लाख रुपये असे एकूण १५ लाख रुपयांची भरीव मदत बुधवारी (दि.२२) जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी रचना कंस्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजर डायरेक्टर सुजीत मुळे, दत्तात्रय मुळे, उषाताई मुळे यांनी १५ लाखाचा धनादेश सुपूर्द केला. यापूर्वी मुळे यांनी गावातील धार्मिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातही सामाजिक बांधिलकी जोपासत भरघोस मदत दिली आहे.

 
Top