तामलवाडी / प्रतिनिधी-
 तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी परिसरात शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी चार वाजण्याच्या सुमारास विजेंच्या कडकडाटासह अवकाळी पाऊसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून  हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाने जपलेल्या पिकांच्या राशी भिजून चिंब झाल्या आहेत. जोराच्या वादळी वाऱ्यामुळे वैरणीचा कडबा अस्थाव्यस्त पडला आहे. तर काढणीला आलेल्या द्राक्ष बागा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. 
 
Top