उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील  बेंबळी येथे इस्लाम धर्मातील पवित्र रजमान महिना व कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर विधवा महिला व गरजू कुंटूबांना जीवनावश्यक किटचे वितरण करण्यात आले. या वितरणाचा शुभारंभ बेंबळी पोलिस ठाण्याचे पाेलिस निरिक्षक मुस्तफा शेख व सरपंच सत्तार शेख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी एकुण १२५ कुंटूबांना जीवनावश्यक किट देऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तालुक्यातील बेंबळी गावामध्ये सरपंच सत्तार शेख यांच्या नेतृत्वाखाली निरंतर उपक्रम राबविण्यात येत आहेत. गांवात दोनदा जंतुनाशकाची फवारणी नंतर प्रत्येक घरा-घरात मास्क व सॉनिटाझरचे वितरण करण्यात आले. त्यानंतर आता रमजान व लॉकडाऊन च्या पार्श्वभुमीवर हातावर पोट असणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ अल्यामुळे अशा कुटुंबाना आधार देण्यासाठी जीवनावश्यक अन्नधान्याची किट तयार करून त्यांचे वाटप करण्यात आले.  या  किटमध्ये 10 किलो  बासमती  तांदूळ, 5  किलो  गहु पिठाची बॅग, 1   किलो  तेल  पॅकेट, 1  किलो  साखर, 1 किलो मुगडाळ, मीठ पॅकेट, शेवई पॅकेट अशा जीवनावश्यक वस्तुंचा समावेश आहे.
 या वितरण कार्यक्रमास   श्री कुंभार  , युवक काँग्रेस उपाध्यक्ष सलमान शेख, राजाभाऊ नळेगावकर, सामाजिक कार्यकर्त्यां विद्या माने, महेश पाटील,जबीउल्ला शेख  आदींची उपस्थिती होती.

 
Top