उस्मानाबाद/प्रतिनिधी- 
 सद्यस्थितीत देशात व महाराष्ट्रात राज्यात COVID-19  विषाणूचा प्रार्दुभा वेगाने वाढत आहे. त्यामुळे शासन स्तरावरुन दि. 3 मे 2020 पर्यंत संपूर्ण राज्यात LOCKDOWN  चे पालन करण्याबाबत सूचना निर्गमित्त केलेल्या आहेत. त्यातच समाजातील प्रत्येक सबल घटाकडून मजूर/ समाजाती गोरगरीब लोक- शेतकरी/ असाहय व्यक्ति यांना कोणत्या ना कोणत्या  स्वरुपात मदत करणे हे सामाजिक कर्तव्य ठरते. उस्मानाबाद जिल्हयातील महसूल विभागाकडूनही सामाजिक बांधीलकी जपण्याबाबत आव्हान करण्यात आले होते त्याचे भान ठेवून उस्मानाबाद जिल्हयातील राज्य उत्पादन शुल्क भिगाअने ल्हियातील सर्व तहसील कार्यालयाकडे जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप केले आहे. त्यामध्ये उस्मानाबाद 83किट, तुळजापूर 184 किट, उमरगा 195 किट, कळंब 147 किट, लोहारा 50 किट, भूम 216 किट, वाशी 85 किट, अशा एकूण 1025 किटचे वाटप करण्यात आले ज्या प्रत्येक किटमध्ये (गव्हाचे पीठ 2 किलो, तादुळ 2 किलो, तेल 1 किलो, मीठ 1 किलो, साखर 1 किलो, तीखट 250 ग्रॅम हळद 100 ग्रॅम तुरदाळ 1 किलो, अंगाचा साबण 1, कपडयाचा साबण 1) या वस्तुं समावेश असून प्रतिकिटची किंमत रु.500 एवढी होती.
त्याच बरोबर या विभागात एकूण 47 (अधिकारी/ कर्मचारी/ जवान/ जवान नि वाहनचालक / लिपीक/ शिपाई) कार्यरत आहेत. त्यामध्ये वर्ग 1 पासून वर्ग -4 पदांच्या समावेश होतो. त्या सर्वांनी मिळून रोख स्वरुपात एक लाख पासष्ट हजाराची वर्गणी जमा केली. त्यामध्ये वर्ग -1 अधिकारी 2000/- वर्ग -2 अधिकारी 12000, दुय्यम निरिक्षक 7500/- सहाय्यक दुय्यम निरिक्षक 3500/- जवान 2800/-, वाहन चालक 1000/- कार्यालय अधीक्षक 3000/- लिपीक 1000/- यांचा समावेश होते.
वरील सर्व 1,65000/- रक्कम ही  आयुक्त राज्य उत्पान शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे दि. 21 एप्रिल 2020 रोजी जमा केला असून ती सर्व रक्कम आयुक्त यांचेकडून मा. मुख्यमंत्री  सहाय्यता निधीकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री. केशव राऊत यांनी दिली. तसेच या विभागतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या भरीव मदतीमुळे सिर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अधीक्षक श्री. केशव राऊत यांनी आभार व्यक्त केले. असल्याचे राज्य उत्पादन शुल्क, उस्मानाबाद यांनी कळविले आहे. 
 
Top