तेर/ प्रतिनिधी-
 जिल्हाधिकारी यांनी कोरोना संसर्गामुळे  जिल्हात लाँकडाऊन जाहीर करून तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी घातली होती परंतु ग्रामीण भागात अनेक पानटपरीवर  पिशवीतून व खिश्यामधून सुपारीची  विक्री होत होती . दरम्यान  तेर (ता .उस्मानाबाद)  येथील सरपंच नवनाथ नाईकवाडी यांनी सुपारी विक्री करताना  मंगळवार दि.7 रोजी  एका दुकानदारास रंगेहाथ पकडून ती पिशवी जप्त केली.
तेर  ग्रामपंचायतच्या वतीने गावात कोणीही  दारु  व  सुपाऱ्या  विक्री करू नये म्हणून  दवंडी  द्वारे गांवात जनजागृती करून बजावण्यात आले होते. तरीही बरेच जण सुपारीची चोरून विक्री करीत होते. तोंडी सांगून व पोलीसांंना माहती देऊन ही सुपारी विक्री  चालूच होती.मंगळवार दि. 7 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मल्हारराव होळकर चौका जवळ असलेल्या एका टपरी चालकाला पिशवीतून सुपारी विकताना रंगेहाथ पकडून ही पिशवी जप्त करण्यात आली .
 
Top