उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 कोरोनाच्या् पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या  लॉकडाऊनच्या काळात जिल्हयातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न व नागरी पुरवठा  विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहेत.  दि. 1 ते 5 एप्रिल, 2020 या पाच दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण शिधा पत्रिकापैकी 1 लाख 12 हजार 178  शिधापत्रिका धारकांना तब्बल  30 हजार 380.04 क्विंटल अन्न धान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला आहे. जिल्ह्यातील माहे एप्रिल, 2020 करिता   एपीएल शेतकरी योजनेचे  गहु 685 मेट्रिक टन व तांदूळ 458.90 मेट्रिक टन इतके धान्याचे नियतन  मंजूर  असून  त्या‍चे वाटप लाभार्थ्यांना याच महिन्यात करण्यात येणार असल्याची  माहिती  जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती डॉ. चारुशीला देशमुख  यांनी दिली आहे. तसेच टंचाई  भासवून चढ्या दराने कोणीही विक्री केल्यास दुकानदारावर कारवाई करण्यात येईल.
 जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी  असे दोन्ही रेशनकार्ड मधील पात्र लाभार्थ्यांची संख्या् सुमारे 11 लाख 46 हजार 631 आहेत. या लाभार्थ्यांना   स्वस्थ धान्य दुकानांव्दा्रे सार्वजनिक  वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रति कार्ड 23 किलो गहु आणि 3 रु. किलो दराने प्रती कार्ड 12 किलो तांदुळ दिला जातो. त्याचप्रमाणे 20 रु. किलो दराने एक किलो साखर दिली जाते.
 केशरी रेशनकार्ड असलेल्या  प्राधान्य  कुटुंब लाभार्थ्यांना 2 रु. किलो दराने प्रती व्य्क्तीस 3 किलो गहु व 3 रु. किलो दराने प्रती व्यक्ती  2 किलो तांदूळ दिला जातो.
 तसेच केशरी रेशनकार्ड असलेल्या एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना 2 रु. किलो दराने प्रती व्ययक्तीस   3 किलो गहु व 3 रु. किलो दराने प्रती व्यकक्तीस 2 किलो तांदूळ दिला जातो.  उस्मानाबाद जिल्ह्यात या योजनेमधून दि. 1 एप्रिल, 2020 ते 5 एप्रिल, 2020 या कालावधीत सुमारे 30 हजार 380.40   क्विंटल गहु व तांदूळ वाटप करण्यात आले आहे.
 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती  महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर  त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त  तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे दिलेली आहे. त्या मुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्या्नंतर प्रती व्यक्तीस 5 किलो तांदूळ  कुटुंबातील व्यक्तींच्या् संख्येनुसार मोफत उपलब्धे करुन देण्यात येणार आहे. या  योजनेतील अंत्योदय योजनेकरिता 877.10 मेट्रिक टन व प्राधान्य कुटुंब लाभ योजनेकरीता 4766.10 मेट्रिक टन तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम कडून प्राप्त  करुन घेवून पैकी  618.07 मेट्रिक टन इतके नियतन आज दि. 6 एप्रिल, 2020 अखेर जिल्ह्या तील शासकीय धान्य. गोदामापर्यंत पोहोच झाले असून त्याची लाभार्थ्यांना वाटपाची सुरुवात  जिल्ह्यात तुळजापूर तालुक्याकतील पी. के. सावंत व कळंब तालुक्या‍तील श्री. नरहिरे, सुवर्णयुग महिला बचत गट, वाशी तालुक्या तील दुकान क्रं. 1,3,8 तसेच उमरगा तालुक्या‍तील  दुकान क्र. 5, 9, 11, 12 अशा एकुण  10   रास्तभाव दुकानामधून दि. 6 एप्रिल, 2020 पासून वाटपास सुरुवात करण्यात  आली आहे व उर्वरीत रास्तभाव दुकानामध्ये   सदरचे  धान्य पोहोच करून या आठवडयात  पात्र लाभार्थ्याना मोफत वाटप करण्या्त येणार आहे.  हे मोफत धान्य  माहे एप्रिल सोबतच मे आणि जून मध्ये  सुध्दा त्या त्या महिन्यात उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
जास्त दराने वस्तुंची विक्री  केल्यास होणार कारवाई 
 जिल्ह्यात जीवनावश्यक  वस्तुंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तुंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी  घेत आहे. मात्र सध्या  लॉकडाऊनच्या पार्श्व भूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त  होत आहेत. जीवनावश्यक  वस्तुंची साठेबाजी किंवा चढ्या दराने  विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र  विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्यांचे निर्देश जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत, अशी माहिती उस्मानाबादचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती डॉ. चारुशीला देशमुख यांनी दिली आहे.
 
Top