कळंब/प्रतिनिधी-
 देशांमध्ये कोरोना या रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्यामध्ये संचारबंदी केली आहे तरी पण बरेच नागरिक या संचारबंदी (कलम 144)चे उल्लंघन करीत आहेत त्यामुळे शहरात दि.०१ एप्रिल २०२० रोजी (कलम१४४) संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्या अशा ५० मोटरसायकल स्वरावर पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलीण्
 कोरोणा रोगाच्या पार्श्वभूमीवर शहरातील लोक विनाकारण बाहेर पडत आहे त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे,  पोलिस निरीक्षक  कळंब वासियांना घरातच बसून कोरोना अशा महाभयंकर रोगावर मात करून पोलिसांना सहकार्य करा असे आव्हान त्यांनी केले आहे तरी इथून पुढे विनाकारण फिरणाऱ्या मोटरसायकलस्वार यांच्यावर दररोज अशी कारवाई करण्यात येणार आहे असे पोलीस निरीक्षक कळंब तानाजी दराडे यांनी सांगितले.

 
Top