उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 दिल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमाचे कनेक्शन थेट उस्मानाबाद जिल्ह्यापर्यंत पोचले आहे. जिल्हा प्रशासनाने ‘त्या‘ आठ नागरिकांचा तपास सुरू  आहे.
दिल्ली येथे एका धार्मिक कार्यक्रमानंतर अनेक नागरिक कोरोणाबाधित झाल्याचे उघडकीस आले आहे. बाधीतांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक नागरिकाचा शोध घेतला जात आहे.
अशा बाधीत नागरिकांच्या संपर्कामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ नागरिकांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. त्या आठ व्यक्तींचा शोध जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातही कोरोणाचे लोन पसरण्याचा धोका वर्तविला जात आहे. त्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून अशा नागरिकांची शोध मोहिम गल्ली, गावात सुरू झाली आहे.
हे सर्व नागरिक विविध तालुक्यातील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संबंधित गावात जावून प्रशासन ‘त्या‘ नागरिकांचा शोध घेत आहे. त्यांचा शोध घेतल्यानंतर त्यांची ही तपासणी केली जाणार आहे. सर्दी, खोकला, ताप अशी काही लक्षणे आढळली तर त्यांच्यावर पुढील उपचार केले जातील.  शिवाय दिल्लीहून आलेल्याच्या संपर्कात असलेल्या सर्वांची तपासणी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यासाठी कसून तपासणी सुरु केली आहे.
सतर्कतेचा आदेश 
जिल्ह्यातील काही नागरिकांचा संपर्क दिल्लीतील नागरिकांशी झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने यावर प्रभावी उपायोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ज्या भागात हे नागरिक आले आहेत. त्याभागातील नागरिकांना घराबाहेर फिरण्यास सक्त मनाई केली आहे. शिवाय जिल्ह्यातही नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  आठपैकी दोघेजण अद्यापही दिल्लीतच असल्याची माहिती समोर आली आहे. तर एका जणाचे दोन मोबाईल क्रमांक असल्याने त्यांचेही नाव दोन वेळा यादीत समाविष्ट झाले आहे. तर उर्वरीत नागरिकांचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.
जिला प्रशासनाचा खुलासा
दिल्ली येथील कार्यक्रमासाठी गेलेल्या आठ जणांपैकी एकाचे नाव डबल असल्याचे समजले, त्यामुळे सातच लोक उस्मानाबाद जिल्हयातुन गेल्याचे समोर आले आहे. सात लोकांपैकी तीन लोक उस्मानाबाद जिल्हयात परतले असून त्याच्या वैद्यकीय तपासणीत ते कोरोना िनगेटीव्ह असल्याचे समोर आले आहंे. तरी देखील प्रशासनाने त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचे आदेश दिले आहेत.  सात पैकी उर्वरीत चारजण दिल्ली येथेच असून त्यापैकी एका इसमाचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांिगतले आहे.


 
Top