

उस्मानाबाद शहरात १५० विद्यार्थी संत गोरोबा काका नगर येथे तर १६० विद्यार्थी शिंगोली येथील आश्रम शाळेत तर विद्यार्थ्यांची व्यवस्था बावी येथील आश्रम शाळेत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकार ची ही योजना असून राज्यामार्फत या आभ्यासक्रमासाठी हे विद्यार्थी पाठविले जातात. कोरोना वायरसच्या लॉकडाऊन नंतर सदर संस्थेने विद्यार्थ्याना वाऱ्यावर सोडले सदर विद्यार्थ्यांची उपासमार होत असल्याचे समझल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने रूपामाता उद्योग समुहाला फुड पॉकीट वाटपाचे नियोजन देण्यात आले. गुरूवार दि.२ एप्रील रोजी रूपामाता उद्योग समूहासह आदर्श शिक्षण संस्था व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ही फुड पॉकीट व फळांचे वितरण करण्यात आले.
यावेळी आयकर सहाय्यक आयुक्त मुंढे, उपविभागीय अधिकारी रोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, रुपामाताचे अध्यक्ष ॲड.व्यंकटराव गुंड, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे शेषाद्री डांगे, संचालक राजा वैद्य, पत्रकार संतोष जाधव, ॲड.अजित गुंड, समुहाचे सल्लागार ॲड.विद्दुलता दंलभंजन, मिलींद खांडेकर , सोमेश्वर शिंदे, अजय नाईक ,् शुभम घोगरे , रोहीत लोकरे, गुरुदत्त लोंढे, भागीरथी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष अभिराम सुधीर पाटील आदींची उपस्थिती होती.