तुळजापूर/प्रतिनिधी -
महामानव  डॉ. बाबासाहेब यांच्या 129 व्या जयंती निमित्ताने भाजपा मिडीया सेल शहराध्यक्ष  सागर कदम यांच्या वतीने  पुतळा परिसरातील कर्तव्य बजावत असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी साहेब, नगर परिषद कर्मचारी, पेट्रोल पंप चालक यांना १२९ मास्क तसेच भिमनगर येथील युवक - लहान मुलांना  १२९ कापडी मास्क  वाटप करुन जयंती साजरी करण्यात आली:
 यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक राठोड साहेब, पो. उपनिरीक्षक विकास दांडे साहेब, सागर कदम, अक्षय कदम, आदेश कदम , भाजपा माहिला आघाडी तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्षा संगीताताई कदम यांची उपस्थिती होती .
 
Top