तुळजापूर/प्रतिनिधी-
 कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या  लाँकडाऊन पार्श्वभूमीवर महामानव विश्वरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून घरच्या घरी विविध उपक्रम राबवून  कोरोना बाबतीत जनजागृती करुन साजरी करण्यात आली . येथील क्रांती चौकातील  महामानव डाँ. आंबेडकर यांच्या  पुतळ्यास व नगरपरिषद मध्ये डाँ आंबेडकर यांच्या प्रतिमेस  नगराध्यक्ष सचिन रोचकरींचा हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपाई जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम सह नगरसेवक सोशल डिस्टंन्स पाळुन सहभागी झाले होते.
कोरोना पार्श्वभूमीवर डाँ आंबेडकर  जयंती  घरीच प्रतिमा पुजन करून, बुध्द वंदना घेऊन, विद्यार्थ्यांनी किमान आठ तास अभ्यास करून, जेष्ठाने विविध ग्रंथाचे वाचन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. चिमुकल्या मुलीनी डाँ .आंबेडकर जयंतीनिमित्ताने घरासमोर आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून कोरोना विषयी जनजागृती करणारे संदेश   जयंती  साजरी करण्यात आली.
या वर्षीची जयंती घरीच साजरी करु या ! कायद्याचे पालन करुया !! कोरोनाला हरवु असा संदेश रांगोळी काढुन  महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचाराचे आचरण करीत यंदाची डा़ँ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आला.
 
Top