परंडा / प्रतिनिधी   -
भारतीय जनता पार्टी परंडा तालुक्याच्या वतीने ५००० (वाॅशेबल) मास्क वाटप करण्यात येत असून   दि.१४ मंगळवार रोजी क्रांतीचे महासूर्य, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भारतीय जनता पार्टी परंडा तालुक्याच्या वतीने २००० मास्क (वाॅशेबल) शहरात वाटप करण्यात आले.तर उर्वरित मास्क ही वाटप सुरूच असणार आहे.
  यावेळी भाजपा न.प.गटनेते सुबोधसिंह ठाकुर,भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, शहराध्यक्ष जहीर चौधरी, भाजपा नगरसेवक विठोबा मदने, अन्वर लुकडे, गणेश जाधव,मुस्सा हन्नूरे,गणेश राशनकर आदी उपस्थित होते.

 
Top