तुळजापूर/ प्रतिनिधी-
कोरोना पार्श्वभूमीवर अर्थिक उलाढाल ठप्प असल्याने एप्रील मे जून या कालावधीतील घरपट्टी, पानीपट्टी, स्वछता कर सरसकट माफ करण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक सुनिल रोचकरी यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देवुन केली आहे. निवेदनात म्हटलं आहेकी कोरोना चे संकट देशावर आले असुन केंद्र व राज्य सरकार जनतेला आपआपल्या पध्दतीने देशवासियांना मदत करीत आहे सध्याची परिस्थिती बघता नागरिकांना विविध कर भरणे अशक्य आहे तर सर्व कर सरसक माफ करावे असे निवेदनात म्हटलं आहे.

 
Top