लोहारा/प्रतिनिधी
कोरोना संकटावर मात करण्यासाठी सर्व पातळ्यांवर शासकीय व प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र उपाययोजना करण्यासाठी धडपडत आहेत. या संकटातून सर्वांची सुखरूप मुक्तता व्हावी म्हणून जनतेला सुचना व आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. तेव्हा सर्वांनी घरातच राहून कोरोना मुक्त भारत करु या असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे यांनी केले आहे. काळ कठीण आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सध्या तरी कोरोनावर कोणतीही लस अथवा औषध उपलब्ध झालेले नाही. हा कोरोनाचा विषाणू केवळ मोठया प्रमाणात संपर्कामुळे पसरत आहे. यामुळेच तर सर्व जनतेला घरीच राहणे सक्तीचे केले जात आहे.हाच एकमेव मार्ग आहे.
आपण घरी बसून महापुरुषांची चरित्रे वाचने, ज्वलंत विषयावर लिखान करणे, अभ्यासक्रमा बाबतच्या नोटस् काढणे, एखादया आवडीच्या विषयावर ऑनलाईनद्वारे चर्चा करणे,एखादा चांगला छंद यानिमित्ताने पूर्ण करणे, परीक्षेच्या पेपर विषय चिंतन करणे,स्पर्धा परीक्षेचा वस्तुनिष्ठ अभ्यासासोबतच आपल्या घरातील कितीतरी चांगल्या गोष्टी आपणाला यावेळी करता येऊ शकतात.सध्या संपूर्ण देश ता.14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनमध्येच आहे. या वेळेचा तरुणांनी फायदा घेतला पाहिजे. ही वेळ पुन्हा येणे नाही.तरीपण काही अति उत्साही मंडळी घराबाहेर काहीही कारणे सांगून रस्त्यांने फिरताना दिसत आहेत. ही धोक्याची घंटा आहे.अबी नहीं तो कभी नहीं ! या विधानाप्रमाणे आपली प्रत्येकाची तितकीच जबाबदारी खूप मोठी आहे. जिथे अनेक राष्ट्रे उध्वस्त होताना तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यांनी चायनलवर पाहतो आहोत. विकसित राष्ट्रांची ही स्थिती असेल तर आपण आपल्या राष्ट्राबद्ल न बोललेलेच बरे.आज आपल्या देशात या कोरोनाचा सामना करताना डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी, प्रशासना सोबतच आपल्यासाठी  रस्त्यावरती कर्तव्यदक्ष पोलीस नि:स्वार्थीपणे, कशाचीही परवा न करता,स्वत:च्या कुटूंबाचा देखील विचार न करता आपल्यासाठी आहोरात्र कष्ट घेत आहेत.
आपण तरी आपल्या कुटुंबासोबत घरी आहोत.पोलीस मात्र कर्तव्य निभावताना व बंदोबस्त करताना दिसत आहेत.केवळ लोकांच्या हितासाठी आपले कर्तव्य जबाबदारीनी पार पाडत आहेत.या सर्व कर्मचाऱ्यांनाही कोरोना विषाणूमुळे धोका आहेच पण आपला जीव मुठीत घेऊन व जीवावर उदार होऊन काम करीत आहेत.ते पण आपल्या सर्वांसाठीच ना. मग सर्वांनी घरीच शांत बसू या. पण आपल्यातील काही लोक अशा पोलीस कर्मचाऱ्यांना  आम्हाला इतरत्र जाण्यास व बाहेर फिरण्यास बंधन घालीत आहेत म्हणून काहीजण त्यांनाच वेडेवाकडे अपशब्द बोलताना अथवा त्यांच्यावरती काही मंडळी मारण्याकरीता धाव घेताना सोसल मीडीयातील व्हीडीओवरुन दिसून येत आहेत.हे कितपत योग्य आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. हे काम करताना एखादा कर्मचारी बोललाही असेल अथवा काटी मारलीही असेल पण आज त्यांच्यावर खूप मोठा ताणतणाव आहे हे आपण ओळखले पाहिजे.थोडा संयम ठेवा,तुम्ही पण जगा आणि इतरांनाही जगू द्या,चिंता करु नका पण चिंतन करुन जबाबदारीने सर्वांनी एकमेकांची काळजी घेऊ या.आपल्या बलशाली व समृध्द राष्ट्राची अखंडता मजबूत करण्यासाठी एकसंघपणे लढून एक आदर्श लोकशाही राष्ट्र सिध्द करण्यासाठी एकजुटीने या कोरोनाला हद्दपार करु या असे शेवटी डॉ.महेश मोटे यांनी युवकांना उद्येशून आवाहन केले.

 
Top