उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र संचारबंदी लागल्यामुळे आंध्रप्रदेश , केरळ,  तेलंगणा या तीन राज्यातील २००  विद्यार्थी उस्मानाबादमध्ये अडकून पडले आहेत या विद्यार्थ्यांची निवासाची  सोय जिल्हा प्रशासनाने शिंगोली येथील विद्यानिकेतन आश्रमशाळेमध्ये व बावी येथील आश्रमशाळेत करण्यात आली आहे.  या विद्यार्थ्यांच्या जेवणाची जबाबदारी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व भागीरथी परिवार यांनी घेतली आहे . शनिवारी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व भागीरथी परिवारातील सदस्यांनी आश्रम शाळेला दहा पोते तांदूळ दोनशे साबण दोनशे पेस्ट इत्यादी जीवनावश्यक वस्तूूचे वितरण मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आले . 
यावेळी   उस्मानाबादचे जिल्हा पोलिस अधीक्षक  राज तिलक रोशन ,उपविभागीय अधिकारी रोडगे साहेब डी.वाय.सपी राठोड  , आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर  पाटील , एलसीबीचे पी.आय .शेख, उस्मानाबाद तहसीलदार माळी , आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय  अधिकारी आदित्य सुधीर पाटील ,भागीरथी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष अभिराम सुधीर पाटील, मंडळाधिकारी देशपांडे  , स्वप्नील पाटील ,अनिकेत मोळवणे, किशोर खडे, मयुर चाकवते , तलाठी ग्रामसेवक इत्यादी प्रशासनातील सर्वाधिकारी उपस्थित होते.

 
Top