उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य , रेशन वाटप तसेच विविध परिस्थितीचा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी , पोलिस अधीक्षक , जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या उपस्थितीत आढावा घेतला व अनेक गोर गरिबांना जीवनाक्षक वस्तू खरेदी करता येत नसल्यामुळे पालकमंत्री यांनी सामाजिक संस्थेच्या वतीने 1 कीलो तांदूळ , 1किलो साखर , अर्धा किलो दाळ असे प्रत्येकी 10 हजार म्हणजे 30 हजार पॅकेट देण्याचा निर्णय जाहीर केला
 जिल्ह्यातील किती लोकांना कोरांटाईन केले आहे , किती लोकांच्या टेस्ट केल्या आहे , प्रत्येक आरोग्य केंद्रात काय परिस्थिती आहे , जनतेला जीवनाक्षक वस्तू मिळण्यासाठी काही अडचणी येत आहे का ? गोर गरिबांसाठी रेशन व्यवस्थमध्ये अडचणी येऊ देऊ नका अशा विविध उपाय योजनेची पालकमंत्र्यांनी माहिती घेऊन संबधित खात्याला सूचना देण्याचे आदेश केले .
 संपूर्ण जिल्ह्यात  15 एप्रिल पर्यंत धान्य वाटप चांगल्या पद्धतीने करा ,वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवा गरीबापर्यंत धान्य पोहच करा , जीवनाक्षक वस्तूच्या गाड्या अडवू नका , जिल्हा रुग्णालयात तातडीने प्राथमिक उपचार करा अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या .
 या बैठकीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंढे , पोलीस अधीक्षक राजतीलक रोशन , जिल्हा शलचिकित्सक डॉ राज गलांडे , जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी संजय कोलते , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ एच व्ही वाढगावे , अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष यादव , निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र खंडारे , जिल्हा पुरवठा अधिकारी चारुशीला देशमुख उपस्थित होते .
 मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा आप आपल्या पद्धतीने काम करत आहे . जनतेने घराबाहेर पडू नये खूपच मेडिकल एमर्जनसी असेल तरच घराबाहेर या , तब्यतीची काळजी घ्या व गोर गरीब जनतेला आप आपल्या परीने मदत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.
 
Top