लोहारा/प्रतिनिधी
 सध्या माणूसच माणसाची मदत करू शकतो या भावनेतून श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुरूम यांच्या कडून गरजूंना जीवनावश्यक वस्तुने तयार केलेल्या 100 कीट सोमवार दि. 13 एप्रिल 2020 रोजी उमरगा येथील उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांच्याकडे पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन शिवशरण वरनाळे, उपाध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा यांनी सुपुर्द केले.
माणूसच माणसाच्या मदतीला धावून जातो. माणूसकी हाच आपला एकमेव धर्म आहे.अशी भावना व्यक्त करत प्रशासनाकडून या कीटचे वाटप योग्य व गरजूंना होईल. कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पुढे काय होणार, याची कोणालाही कल्पना नाही. तरीसुद्धा सरकार, प्रशासन आपल्या पातळीवर वेगवेगळी पावले  उचलताना दिसत आहे. प्रत्येक जिल्ह्यात कोरोना रूग्णालय उभारण्याची तयारीही केली जात आहे. तरी पण रुग्णांची संख्या वाढली तर कुठे सोय करायचे, हा सध्या मोठा प्रश्न असल्याने किमान आपण जीवनावश्यक वस्तूच्या रुपाने कीटची मदत व्हावी. हे कीट तयार करण्यासाठी दत्तात्र्य कांबळे, युवराज शिंदे, बाळाप्पा दळगडे, विजय कोरचगांव आदींनी पुढाकार घेतला.
 
Top