
तिर्थक्षेञ तुळजापूर कोरोना पासुन मुक्त राहावे म्हणून नगरपरिषद ने आज पर्यत शहरात विविध औषधांच्या पाच फवारण्या केल्या आहेत.
यात सोडीयम हायकोक्लोराईडच्या तीन, मेलीथाँन चा दोन फवारण्या पाठीवरील पंप, आग्नीशमन वाहन, शेतीच्या अंर्तगत मशागत साठी वापरले जाणारे छोट्या ट्रँक्टर मधुन केल्या आहेत तुळजापूर चे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिलेल्या युपीएल युनिमार्ट या कंपनीच्या अत्याधुनिक फवारणी यंञा मार्फत सध्या फवारणी केल्या जात आहेत . यामुळे वेगाने व कमी मनुष्य बळात अधिक औषधे फवारणी होत आहे.रविवारी अर्धे तुळजापूर व सोमवारी अर्धे तुळजापूर अशा दोन दिवसात शहर निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे,
यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी मुख्याधिकारी अशिष लोकरे विनोद गंगणे आनंद कंदले स्वछता निरक्षक एम आय शेख सह त्या -त्या भागातील नगरसेवक व नगरपरिषद चे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थितीत राहत होते.