उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, या संस्थेच्या वतीने, सध्या कोरोनाचा पादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यसरकार अनेक उपाययोना करते आहे.सध्या देशात व राज्यात  संचारबंदी आहे संपूर्ण देश व राज्य लाॅकडाऊन झाल्याने राज्यातील आर्थिक व्यवस्था ठप्प झाली आहे या संदर्भात संस्थेचे कार्याध्यक्ष मा.अभयकुमार साळुंखे यांनी संस्थेतील राज्यभरातील विविध शाखात काम करणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे  एक दिवसाचे वेतन,म्हणजेच एक कोटी रूपये, महाराष्ट्राचे मुख्यमंञी  उध्दवजी ठाकरे यांच्या मुख्यमंञी सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय आज कोल्हापूर येथे घेतला आहे.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी प.पू.डाॅ.बापूजी साळुंखे.यांनी आपल्या गुरेदेव कार्यकर्ते यांना अगोदरच सांगितले होते आपल्या पगारातील कांही हिस्सा समाजासाठी खर्च करावा त्याच भूमिकेतून देशावर व राज्यावर ज्या ज्या वेळी नैसर्गिक संकट येते तेंव्हा श्री स्वामी विकेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने नेहमीच मदत केली जाते.
या संदर्भात उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य व मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी  आशी माहिती दिली की,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने मुख्यमंञी निधीसाठी एक कोटी रेपये मदत देण्याचे पञ संस्थेने आज राज्याचे मुख्यमंञी यांना पाठवले आहे.लवकरच एक कोटीची मदत सुपुर्द करण्यात येणार आहे

 
Top