तुळजापूर/ प्रतिनिधी -
राज्यातील रक्तपेढ्या मधील रक्त  पुरवठा कमी होत असल्याने राज्याचे आरोग्य मंत्र्यांनी व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केलेल्या आवाहन नुसार आपसिंगा ग्रामपंचायतच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.  या शिबीराचे उद्घाटन माजी जि.प. अध्यक्ष तथा जि.प. सदस्य अॅड धीरज पाटील यांनी रक्तदान करून केले.  या रक्तदान शिबीरात एकुण ३५ जणांनी रक्तदान करून गरजू रूग्णांना रक्ताची मदत केली.
 
Top