उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे ४ रुग्ण असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये दिल्याने खळबळ उडाली होती. तो रुग्ण कुठला? यावर सर्वत्र चिंता व चर्चा होत असतानाच त्या रुग्णाबाबत उस्मानाबादचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉराजाभाऊ गलांडे यांनी माहिती दिली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील मूळ गाव असलेला एक रहिवासी मुंबई येथील कुलाबा येथे राहत असून त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर मुंबई येथे उपचार सुरु आहेत.हा रुग्ण कोरोना अहवाल येण्यापूर्वी व नंतर उस्मानाबाद जिल्ह्यात आलेला नाही त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे डॉ गलांडे म्हणाले. रुग्णाने दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर गावचा पत्ता उस्मानाबाद जिल्ह्यातील सांगितल्याने त्याचे नाव उस्मानाबादच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा रुग्ण उमरगा तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. हा रुग्ण मुंबई येथील हॉटेल ताज मध्ये वेटर असून त्याचे स्वॅब घेतल्यानंतर ते पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा रुग्ण गेल्या काही महिन्यापासून त्याचे कुटुंबीय, नातेवाईक यांच्या संपर्कात आला नसून तो गावीही आला नसल्याने घाबरण्याचे कारण नाही असे गलांडे म्हणाले. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरोनाचे ३ रुग्ण  असून त्यांच्यावर उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 
Top