तुळजापुर/ प्रतिनिधी-
 तालुक्यातील मसला (खुर्द) येथील शेतकरी  चंद्रकांत विनायक नरवडे यांनी  सोमवारी कोरोना सहाय्यता निधीस सुमारे  एक लाख रुपये निधीची मदत केली.
  तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील शेतकरी चंद्रकांत विनायक जाधव यांनी  देशावर कोरोना चे संकट आल्याने देशाला याकालावधीत मदत करणे कर्तव्य असल्याचे मानुन पंतप्रधान सहाय्यता निधीस पन्नास हजार  व  मुख्यमंत्री सहायता निधी साठी   50 हजार असे एक लाख रुपयेचा  धनादेश शासनाला मदत म्हणून तहसीलदार श्री सौदागर तांदळे यांच्या कडे सुपुर्द केला. यावेळी नगराध्यक्ष श्री सचिन रोचकरी, आनंद कंदले, लक्ष्मण नरवडे, दादा घाटशिळे व नितिन कदम हे  उपस्थित होते.

 
Top