उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्यदूत म्हणून अविरतपणे काम करणाऱ्या बेंबळी येथील पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच बेंबळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आणि गावाच्या विकासात महत्वपुर्ण योगदान देणाऱ्या पत्रकारांना बेंबळी येथील समाजकार्यात सक्रीय योगदान देणारे डॉ. आमोल गावडे यांनी आयुषच्या निर्देशानुसार मोफत रोगप्रतिकारशक्ती वाढीच्या गोळ्याचे वितरण केले.
प्रारंभी डॉ. आमोल गावडे यांनी उपस्थित  बेंबळी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी, बेंबळी येथील पत्रकार, ग्रांमपंचायत कर्मचाऱ्यांना होमोपॅथी उपचारासंदर्भात महत्वपुर्ण माहिती देऊन स्वास्थ्य बाबत घ्यावयाची काळजी संदर्भात अनमोल मार्गदर्शन केले. यावेळी बेंबळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक  श्री्. शेख यांनी  कोरोना विषयासंदर्भात सविस्तारपुर्ण चर्चा करून आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. त्यानंतर डॉ. गावडे यांनी मोफत वितरीत केलेल्या रोगप्रतिकारशक्तीवाढीच्या गोळया कशा पध्दतीने घ्यावयाच्या आहेत व त्या घेतल्यानंतर काशाचे सेवन करायाचे नाही हे समजवून सांगितले.
या कार्यक्रमास  सहायक पोलिस निरीक्षक  श्री. शेख, दिनकर गोरे , सज्जन वाघमोडे , श्री.कपाळे  , श्री.साठे  , श्री.भांगे  , श्री. घायाळ , सामाजिक कार्यकर्ता गालिब पठाण, रणजित बरडे, पत्रकार शितलकुमार शिंदे, ज्येष्ठ पत्रकार अमर कटके, अमोल गाडे, गोविंद पाटील, नितिन खापरे, बालाजी माने, सुनिल वेदपाठक प्रभारी, सरपंच सत्तार शेख, कर्मचारी निळकंठ रेडेकर, कृष्णप्रसाद गावडे, बाबा शेख आदी सोबत ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top