उस्मानाबाद / प्रतिनिधी -
प्रेमाचा शब्द, स्नेहाचा स्पर्श, आपुलकीची नजर, कौतुकाची थाप, खळखळून हास्य आणि मदतीचा हात .. अशा या छोट्याशा गोष्टी आपल्या बरोबरच इतरांचे आयुष्य बदलून टाकतात. अशा एका छोट्याशा उपक्रमातून ताकविकी वृक्षसंर्वधन ग्रुपने ताकविकीतील गरीब गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या ग्रुपने गावातील ५० गरजू कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तूंच्या रूपाने मदत केली आहे.
कोरोना साथीने उपासमारीला सामोरे जात असलेल्या गरजू-गरीब कुटुंबाना मदतीचा हात पुढे केला तर या कुटुंबाचा आधारवड होता येईल या भावनेतून ताकविकी काही मंडळीकडून आतापर्यंत ५० कुटुंबाना जीवनावश्‍यक वस्तूंच्या रूपाने मदत केली आहे. गोरगरिबांना मदतीसाठी गावातील अनेक तरुण एकविचाराने पुढे येत आहेत.
कोरोना विषाणू साथीने रोजगाराच्या वाटा बंद झाल्या आहेत. लॉकडाउन असल्याने बंद दरवाज्यांच्या आत अनेक कुटुंबांना उपाशीपोटी जगावे लगत आहे. भीषण वास्तव समोर दिसत असल्याने ताकविकी वृक्ष संवर्धन ग्रुपने गावातील सर्वच आर्थिकदृष्टीने सक्षम ग्रामस्थांना आवाहन केले त्या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत ग्रुपकडे  ४० जणांनी मदत केली आहे. गरीब-गरजू कुटुंबांना किराणा वस्तू वाटप करण्याचा निर्णय घेतला.  मोठी आर्थिक स्वरूपात रक्कम जमा झाल्यानंतर या रकमेतून जीवनावश्‍यक वस्तूंच्या स्वरूपात प्रत्येकी ५०० रुपयांचे साहित्य ५० कुटुंबांना मदत देण्यात आले. या कीटमध्ये साखर, शेंगदाणे, चहा, साबण, तेल, मिरची पावडर, मीठ, डाळ आदींचा समावेश आहे. जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करुन ताकविकी वृक्ष संर्वधन ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
 
Top