उस्मानाबाद /प्रतिनिधी-
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उसमनाबाद स्बकॅम्पस बोर्डचे सदस्य प्राचार्य डॉ अशोक मोहेकर यांनी पत्नीसह स्वतःचेही एक महिन्याची पेन्शनची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली आहे.
 मा कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी विद्यापीठातील तसेच सलग्नीत महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांनी मुख्यमंत्री निधीत रक्कम जमा करावी असे आवाहन केले होते. यानंतर कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर व प्रा अंजली  मोहेकर या दाम्पत्यांने कोरोना आपत्ती काळात राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनास मदत व्हावी या उद्देशाने खारीचा वाटा म्हणून मुख्यमंत्री निधीस आपल्या निवृत्तीवेतनामून १ लाख १० हजार रूपयाची मदत केली आहे. मदतीचा धनादेश तहसीलदार मंजुषा लटपटे यांचेकडे नुकताच  स्वाधीन करण्यात आला आहे. प्राचार्य डॉ अशोकराव मोहेकर यांचे  शिक्षण व सामाजीक क्षेत्रात मोठं योगदान आहे. नैसर्गिक आपत्तीत येणाऱ्या संकटात ते नेहमीच जाउन येतात. महापूर असो, दुष्काळ असो, धार्मिक -१९ सामाजिक कार्यक्रम असो अथवा  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्ती असो .
डॉ.मोहेकर हे नेहमी मदत करण्यासाठी अग्रेसर असतात . त्यांनी अनेकांची अडलेली शिक्षणे स्वतः फिस भरून पूर्ण केली आहे. ज्ञानप्रसारक मंडळाचे सचीव म्हणून कार्यरत असलेल्या व  मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य, ऊस्मानाबाद येथील विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक म्हणून , डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे व्यवस्थापन परिषदेवर, विज्ञान शाखा प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या प्राचार्य डॉ अशोकराव मोहेकर व प्राध्यापिका सौ.अंजली मोहेकर यांनी आपल्या निवृत्तीवेतनातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार त्यांनी कळंबच्या तहसीलदार मंजूषा लटपटे यांच्याकडे एक लाख दहा हजार रूपयाचा धनादेश शुक्रवार ता. २४ रोजी सुपूर्द केला आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनिल पवार, नायब तहसीलदार परविन पठाण हे ही उपस्थित होते.

 
Top