उस्मानाबाद /प्रतिनिधी-
देशात कोरोना जैविक विषाणुचे संकट आहे, कामगार मजुर,घरकाम करणाऱ्या महिला व सर्वसामान्यांची अवस्था बिकट झाली आहे,रेशन धान्य दुकानातून मिळणारे धान्य हे कार्डधारकांना दिले जात आहे परंतु ज्यांना रेशनकार्ड नाही अशासाठी काय आणि सध्या रमजानचा महिना चालु असुन बिगर रेशनकार्ड धारकांना ही अन्नधान्य किट मिळावी म्हणुन उस्मानाबाद चे तहसीलदार गणेश माळी   यांना अंजुमन हेल्थकेअर सोसायटी व शहेजाद वेलफेअर सोसायटी ने मागणी विनंती केली असता पालकमंत्री  गडाख यांनी उपलब्ध केलेल्या अन्नधान्य किटातुन पन्नास किट आमदार  कैलास दादा पाटील यांच्या हस्ते देण्यात आल्या.या मदतीमुळे पन्नास जणांना अन्नधान्य किटातुन दिलासा मिळाला आहे.
या मदतीमुळे अंजुमन हेल्थकेअर संस्थापक फिरोज पल्ला ,शहेजाद वेलफेअर संस्थापक गफार भाई शेख व सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी प्रशासन ,लोकप्रतिनिधी यांचे आभार मानले. 
 
Top