तुळजापूर / प्रतिनिधी
कोरोना संसर्गजन्य रोगावर मात करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयाचे खा.ओमप्रकाश निंबाळकर यांनी खासदार स्थानिक विकास अंतर्गत रुग्णपयोगी साहित्य खरेदी साठी उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर ला पंधरा लक्षनिधी मंजुर करुन दिला आहे.
मागील काही दिवसापुर्वी खा. निंबाळकर यांनी उपजिल्हारुग्णालयास भेट देवून उपजिल्हारुग्णालय वैद्यकीय अधिकारी डाँ चंचला बोडके व डाँ प्रविण रोचकरी यांच्या कडून समस्या जाणुन घेतल्यानंतर त्यांनी COVID-19 विषाणूमुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हातील तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपल्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून 15 लाख रूपये निधी हा 1 व्हॅटिलेटर व सेंट्रल ऑक्सिजन सिस्टिम बसविण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे.

 
Top