तेर/ प्रतिनिधी-
 राष्ट्रवादी युवती काँग्रेसने महाराष्ट्रासाठी अभिनव उपक्रम “माझा महाराष्ट्र माझं कुटूंब” हा उपक्रम राबवित असल्याची माहीती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यानी दिली. 
आज राज्यात कोरोनाचे पेशंट वाढतच आहेत. या महामारीला सर्वांनी मिळून उत्तर द्यायला हवे. आज अनेक कामगार, मजूर , भटंकती करून पोट भरणारे लोक लाॅकडावून मुळे आडकले आहेत. आशा परिस्थितीत जनजीवन विस्कळीत झाले असताना मानवतेची साखळी करून आपण सर्वांनी महाराष्ट्रासाठी एकत्र येवून आपले योगदान दिलेच पाहिजे. म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेस तर्फे माझा महाराष्ट्र माझं कुटूंब हे अभियान राबवत आहे.  आज राज्याची लोकसंख्या 11 कोटी आहे. आपण प्रत्येकाने एक एक रूपया जरी जमा केले तरी 11 कोटी सरकारी तिजोरीत जमा होतील. चला तर आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या कुटुंबासाठी योगदान देवूया असे आवाहन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यानी केले आहे.

 
Top