उस्मानाबाद/प्रतिनिधी
 जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांची लॉकडाऊन, संचारबंदीमुळे उपासमार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, उमरगा, भूम, परंडा, वाशी, लोहारा, मुरूम, नळदुर्ग शहर व तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना जिवनावश्यक वस्तुंचे तातडीने वितरण करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याकडे सोमवारी (दि.१९) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सरचिटणीस संतोष जाधव, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, प्रांत प्रतिनिधी मोतीचंद बेदमुथा यांची स्वाक्षरी आहे.

 
Top