तुळजापूर  (प्रतिनिधी) :         
सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीज संस्था, (CYDA) पुणे कडून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोणती ही व्यक्ती अन्नापासुन वंचित राहू नये यासाठी  तुळजापूर तालुक्यामधील  बसवंतवाडी  गावातील ५० गरजू कुटुंबांना किराणा मालाचे कीट सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीज संस्थेचे जिल्हा समन्वयक श्री. आप्पासाहेब धनके यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.   याबरोबरच संस्थेच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा,  नाशिक, नंदुरबार आणि हैदराबाद येथील ५५०० गरजू कुटुंबांना ही किराणा मालाच्या कीटचे वाटप करण्यात आले आहेत.
कोरोना व्हायरस आपत्तीच्या काळात निराधार व गरजू कुटुंबांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीज संस्थेने संस्थापक श्री म्यॅथु सर, संचालक प्रवीण जाधव सर व इतर टीम देणगी जमा करून त्यातून मा. जिल्हाधिकारी यांच्या आव्हानानुसार व त्यांनी ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे  किराणा सामानाचे कीट तयार करून गरजू कुटुंबांना त्यांचे वाटप करत आहेत.
उस्मानाबाद जिह्ल्यातील  लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी टाटा सामाजिक संस्था तुळजापूरचे सामाजिक कार्यकर्ता श्री. गणेश चादरे व कोरोना समन्वय समिती तुळजापूर यांनी सहकार्य केले.
 
Top