उस्मानाबाद/प्रतिनिधी-
लाॅकडाऊननंतर केंद्राच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत १ लाख ७० हजार कोटीचे विशेष पॅकेज जाहीर केले. या अंतर्गत गरीब कुटुंबांना अंत्योदय व प्राधान्य रेशन कार्डवर नियमित धान्याव्यतिरीक्त प्रतिव्यक्ती ५ किलो अतिरिक्त असे तीन महिन्याचे एकत्रित धान्य देण्याची व्यवस्था केलेली आहे. परंतु, प्रत्यक्षात रेशन दुकानातून केवळ नियमितचे धान्य वाटप सुरू अाहे. तरी तीन महिन्यांचे मोफतचे धान्य तातडीने द्यावे, रेशनकार्ड, आधारकार्डवर व दोन्हीही नसलेल्यांना तहसील पातळीवर पडताळणी करून धान्य वाटप करण्याची मागणी भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली अाहे.

 
Top