उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 तुळजापुर तालुक्यातील खडकी येथे  अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खडकी व महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गरजु लोकांना मोफत धान्य वाटप तामलवाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मिरकर साहेब व संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम जवान यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे. यावेळी सरपंच सुशीला सोनवणे,ग्रामसेवक शिवाजी दुधभाते,तंटामुक्तचे माजी अध्यक्ष हणमंत शिंदे,माजी उपसरपंच बबन भंडारे,मल्लिनाथ कोरे उपस्थित होते. या वर्षी कोरोना या आजारामुळे जयंती साजरी न करता गावातील लोकांना  धान्य संस्थेच्या वतीने मोफत वाटप करण्यात आले आहे. संस्थेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून आनेक समाज उपयोगी कामे राबविण्यात येत आहेत. कोराना आजारा दरम्यान संस्थेच्या वतीने पहिल्या टप्प्यात २७ मार्च रोजी ५०० मोफत मास्क वाटप गावात करण्यात आले. तर आज दुसर्‍या टप्प्यात एका कुटुंबाला २ किलो गहु २ किलो ज्वारी,१ किलो साखर असे ५ किलो धान्य वाटप करण्यात आले आहे.
तर तिसर्‍या टप्प्यात गावातील नागरिकांना धान्य,किराणा माल व भाजीपाला हा मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी संस्थेचे सचिव तथा महा एनजीओ फेडरेशनचे उस्मानाबाद जिल्हा समन्वयक राम जवान यांनी बोलताना सांगितले. तर शेवटी बोलताना ते म्हणाले की लाँकडाऊन संपेपर्यंत गावातील नागरिकांनी घराच्या बाहेर न येता घरातच थांबून या आजाराला घालविण्यासाठी प्रयत्न करावेत. लाँकडाऊन संपेपर्यंत संस्थेच्या वतीने जेवढी शक्य आहे,तेवढी  मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. धान्य वाटपावेळी या ठिकाणी कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्याने नागरिकांनी तोंडाला मास्क व सोशल डिस्टन (दोन व्यक्ती मध्ये एक मिटर) ठेऊन शासनाच्या नियमांचे पालन केले. संस्थेने हे सामाजिक काम करत असताना शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत हे धान्य वाटप केले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर जवान,सिध्दु सुरवसे,नेताजी जवान,बालाजी जवान,मुरली भंडारे आविनाश जवान,विद्याधर सोनवणे,यशवंत जवान, बाबु पठाण,संतोष गायकवाड,आकाश जवान,बंडु साळुंके,हुसेन पटेल,संतोष जवान,विशाल,अलि मुजावर,भोसले,संदेश जवान, रमेश जाधव,मेघराज सुरवसे, ईस्माईल पटेल आदींनी परिश्रम घेतले.

 
Top