कळंब / प्रतिनिधी-
भाटशिरपुरा येथे मागील बऱ्याच वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी गावकरी विशेषतः महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे, त्यातच भर म्हणून रितपुरे गल्ली व चालक गल्ली येथे असलेला जुना बोर मोटर अभावी बऱ्याच दिवसापासून बंद होता त्यामुळे त्या परिसरातील गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती, काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत जागून पाणी भरण्यासाठी थांबावे लागत होते. सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव आणि त्यावर पाण्यासाठी होणारा त्रास अशा दुहेरी संकटात या गल्लीतील लोक सापडले होते.
   सदरील बाब भाटशिरपुरा येथील आदर्श विचार मंचच्या लक्षात आल्यानंतर आज त्यावर तात्काळ उपाययोजना करत सिंगल फेज मोटर ची व्यवस्था करून भर उन्हांत सदरील दोन्ही ठिकाणी मोटर बसवून पाणी चालू करण्यात आले. यामुळे परिसरातील गावकऱ्यांनी विशेषतः महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पाण्याची व्यवस्था झाल्याने दुसऱ्या कामासाठी वेळ देता येईल व शासनाने घालून दिलेले लॉक डॉवून देखील पाळण्यात अडचण येणार नाही.

 
Top