उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सर्वसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सुचनामध्ये दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वृत्तपत्रे व मासिके यांचे घरोघरी जावून वितरीत करण्यास प्रतिबंध केला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी कोरोना कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, 1897 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार उस्मानाबाद जिल्हयात सर्व वृत्तपत्रे व मासिके यांच्या घरोघरी जावून केल्या जाणाऱ्या वितरणास या आदेशाद्वारे दि. 20 एप्रिल, 2020 पासून दि. 3 मे, 2020 पर्यंतच्या कालावधीसाठी प्रतिबंध करण्यात आले आहे. या आदेशाचे कोणतीही
व्यक्ती , संस्था अथवा संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51, महाराष्ट्र कोविड 19 उपायोजना नियम 2020 चे नियम 11 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यास ते पात्र राहतील.      
 
Top