उस्मानाबाद/प्रतिनिधी-
भारत सरकारने कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनच्या कालावधी दि. 3 मे,2020 पर्यंत वाढविला आहे. कोरोना विषाणूचा (COVID-19) प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊनचे कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सुट दिलेली कार्यालये, कामाची ठिकाणे, कारखाने आणि आस्थापनामधील कर्मचाऱ्यांना परवाना, पासेस देणे आवश्यक आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा कोविड 19 चा प्रादुर्भाव होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तसेच लॉकडाऊन कालावधीत आवश्यक वस्तुंची वाहतुक करणाऱ्या वाहनांना वाहतूक परवाना, पासेस देणे. सुट दिलेली कार्यालये, कामाची ठिकाणे, कारखाने आणि आस्थापनामधील कर्मचारी, कामगार, व्यक्तींना प्रवासासाठी प्रवासी पासेस, परवाना देणे, कामाची ठिकाणे, कारखाने आणि आस्थापनामधील कर्मचारी, कामगार, व्यक्तींच्या प्रवासाच्या वाहनांसाठी वाहतूक पासेस, परवाना देणे ही कामे सुसुत्रितपणे होणे आवश्यक आहे.
 त्यामुळे जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार कामाचे स्वरुप व परवाना, पासेस देणारे सक्षम अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. आवश्यक वस्तूंची वाहतुक करणाऱ्या वाहनांना वाहतूक परवाना, पासेस देणे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ,उस्मानाबाद. सुट दिलेली कार्यालये, कामाची ठिकाणे, कारखाने आणि आस्थापनामधील कर्मचारी, कामगार, व्यक्तींना प्रवासासाठी प्रवासी पासेस, परवाना देणे बाबत. INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय दंडाधिकारी / INCIDENT COMMANDER तथा तालुका दंडाधिकारी. कामाची ठिकाणे, कारखाने आणि आस्थापनामधील कर्मचारी, कामगार, व्यक्तींच्या प्रवासाच्या वाहनांसाठी वाहतूक पासेस, परवाना देणे. संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी प्राधिकृत केलेले
अधिकारी. वरीलप्रमाणे परवाना, पासेस देणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांनी नागरिकांसाठी ऑनलाईन अर्ज, करावयाच्या साईट, लिंक याची माहिती उपलब्ध करुन द्यावेत, असेही आदेशात नमूद केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोविड 19 उपायोजना नियम, 2020 चे नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील. हे आदेश आदेशाचे दिनांकापासून दि. 3 मे, 2020 पर्यंत लागू राहतील.
 
Top