उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी दि. 3 मे, 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत.
भारत सरकारच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांमध्ये ई- कॉमर्स कंपन्यांना फक्त जिवनावश्यक वस्तुंचाच व्यापार व पुरवठा करता येईल असे नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना प्राप्त अधिकारानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता ई-कॉमर्स कंपन्यांना फक्त जीवनावश्यक वस्तुंचाच व्यापार व पुरवठा पुढे चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच जीवनावश्यक नसलेल्या इतर कोणत्याही वस्तुंचा व्यापार अथवा पुरवठा करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लघंन झाल्यास ई-कॉमर्स कंपन्यावर कारवाईस पात्र राहतील.
 
Top