उस्मानाबाद/प्रतिनिधी -
उस्मानाबाद जिल्ह्यात सापडलेल्या 3 कोरोनाग्रस्त व लातूर येथील 8 कोरोनाग्रस्त रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या नागरिकांची धरपकड प्रशासनाने सुरू केली असून थेट संपर्कातील नागरिक इन्स्टिट्यूशनल क्वारनटाईनमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने कोरोनाग्रस्त रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या नागरिकांची यादी तयार केली असून त्यातील अनेक जण घरात क्वारनटाईनमध्ये आहेत, घरात क्वारनटाईनमध्ये असताना काही महाभाग हे खुलेआम फिरत आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या काही जणांची पहिली स्वॅब टेस्ट झाली व ती निगेटीव्ह आली त्यामुळे काही झाले नाही या आवेशात ही मंडळी फिरत असल्याने त्याची धरपकड करून त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारनटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. उस्मानाबाद शहरातील 11 जणांचा या धरपकड यादीत समावेश असून इतर जणांचा शोध सुरू आहे. उस्मानाबाद शहरातील यादीत अनेक राजकीय नेत्यांचा समावेश आहे.जे नागरिक कोरोनाग्रस्तांच्या थेट संपर्कात आले आहेत त्यांनी समाज हिताच्या दृष्टीने समोर येऊन स्वतः इन्स्टिट्यूशनल क्वारनटाईनमध्ये जाणे गरजेचे आहे.

 
Top